Tuesday, January 10, 2012

"बालपणी भुकेल्या सिंहाला ऊभा फाडला, ठार ज्याणे केला,असा हा छावा शिवाजीचा

"बालपणी भुकेल्या सिंहाला ऊभा फाडला, ठार ज्याणे केला,असा हा छावा शिवाजीचा,



टिळक देशाच्या सौभाग्याचा शिपाई भगव्या झेंड्याचा....




असा हा माझा राजा, तुरुंगात फसला, औरंगजेब खडखडुन हसला, आना म्हणे सामने गफरला....




संभाजीना औरंगजेबासमोर ऊभा केला, खेचुन दोर दंडाला, जखडुण बेडी पायाला, महाराजांना तिथे आणला. आणी औरंगजेब तक्ख्तावरुन ऊठुन माझ्या राजासमोर आला अण कपटाने बोलला," तबियत पाणी सब ठिक है ना?" आणी होकाराची मान हलवली शुर मराठ्याने.




आणी औरंगजेब चकित झाला,"वही आँखे,वही तेज,वही नज़र नौ बरस का था जब हमने ईसे देखा था और पुछा था क्यूँ रे संभा, तूझे हमारा डर नहीं लगता?" और ईसने जवाब दिया था,"हमे किसीका डर नहिं लगता, हमारी वजह से सबको डर लगता है."




सच कहा था गफर ने कभी कभी ठंडक नहीं पडने दियी,पर अब नहीं, पर अब नहिँ अल्लाह ताला ला जश्न है अब दिखायेंगे..."




आणि त्या खुदाहचे आभार मानायला औरंगजेब घुटने टेकुन नमाज़ च्या रुकज़ाना पढायला लागला....




संभाजीराजे समोर असलेल्या कवि कलश ला ऊद्गारले,"कविजी, कवि आहात आपण, सुचते का एखादी कविता या प्रसंगावर?" आणी कवि कलश आश्चर्याने पाहु लागला, "राजे काय हे? तुम्ही औरंगजेबाच्या समोर आहात,मरनाच्या जबड्यात, म्रुत्युच्या पोटात आहात, आणी विचारता सुचते का एखादि कविता?,भिती नाही वाटत?" आणी पुन्हा विचारले माझ्या राजाने, "कविजी,सुचते का एखादि कविता?"आणी कवि,"हो राजे,




राजन् तूम्हासांजे खुप लढे हो जंग, देख तूम्हारा तेज दखदखजे हो औरंगजेब(राजन् काय तुमचं धाडस,काय तुमचं ते शौर्य ! तुमचं ते धाडस पाहुन स्वतः औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागुन तुमच्यासमोर घुटने टेकुन बसला आहे...)"




"बहुत खुब", राजा.




"खामोश जहन्नमी",औरंगजेव थरथर करत ऊभा राहिला. आणी म्हणाला"पत्थरपुजा करणेवाला धर्म छोड तेरा,प्यारा खुदाह का इस्लाम धर्म ले ले तू मेरा..." आणी असं ऐकल्यानंतर कोणता स्वाभिमानी हिंदु शांत बसेल?




आणी गरजला छावा,"जैसा प्यारा तुझा धर्म तुजला, तैसा हिंदु धर्म मजला,धर्मासाठी मरेन प्रसंगाला,सामने आ हिरव्यासहित खाईल तुजला."




औरंगजेब-"शेवटच्या क्षणी ऐक वचनाला,ह्या क्षणी मारिन मी तुला,मुस्लिम हो करीन सरदार मी तुला..."आणी छावा हसला"सरदारकी ठेव शिळकेला,नायतर वाट कोल्ह्या-कुत्र्यांना,अरे हिंदु मराठ्याच्या पाचवीला पुजलोय आणी मरनाचा आम्हावर झाला,सरदारकीच काय,तुझी बेटी देऊनी मला जावाई जरी त्वा केला, लाथेने तुडविन त्या मोहाला..."




आणी औरंगजेब चकित होत राहिला,"कैसे है




म-हाटे? क्या खिलाते है अपणे बच्चोंको?, अरे क्युँ नहि पैदा हुवा एकभी म-हाटा हमारे जनाने में?"




"अरे संभा क्या है तेरा खजाना?,सारा गेहलुट."




आणी कडाडला छावा,"हिंदुस्तान आमचा खजाना,ईथल्या कणाकणाला मानतो आम्ही सोना,औरंगजेब तु गिळलास आमचा खजाना.पण आम्ही नाही तुझ्यासारखे, घेऊ तलवारीच्या जोरावर मनगटाच्या बळावर, अरे हिंदुस्तान हाक मारुन भिक देतो तुझ्यासारख्याना."




"अरे कैसा है तु? मरनेवाला है फिरभि नहिं डरता....?"




"संभा बताओ कौन-कौन शामिल है तुम्हारे साथ?"




आणी कडाडला छावा,"अरे तक्ख्तासाठी रक्तावर ऊलटनारी जात नाहिये आमची."




"शिवछत्रपतींचे पुत्र आहोत आई भवानीचे पठ्ठे आम्ही."




"याद रख, आमच्याच वाटेला येऊन,आमच्याशिच वाटमारी करना-याची ,त्याच्या वाटेवर जाऊन,त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परत येत नाही, हा आमचा ईतिहास आहे." आणी औरंगजेब बघतच राहिला.




औरंगजेबाने लिहिलय आपल्या म्रुत्युपत्रात-"माझ्या आजोबाने पहिली चुक केली,शहाजीराजांना कर्नाटकात जिवंत राहु दिला,जर शहाजीना मारले असते तर शिवाजी ऊभाच राहिला नसता.दूसरी चुक मी केली,आग्र्याचा भेटीतुन शिवाजी राजांना जिवंत राहु दिला"




पन तिसरी चुक नाही करनार....




आणी म्हणुन संभाजी राजांच्या सजेचे अंमल सुरु झाले.




पहिली आद्न्या सुटली,"काट दो इसकी जबान ये जबान बोहोत चलती है."




आणी हप्शी पुढे झाले,राजांनी जबडा मिटला होता,कान दाबले जबडा ऊघडेना,डोके दाबले तरी जबडा ऊघडेना,मस्तकावर आघात केला तरी जबडा ऊघडेना.




अरे ऊघडेल कसा वाघाचा जबडा आहे, सिंहाच्या जबड्यात घालुन हात मोजीन दात, हि आमची औकात सांगनारा छावा आहे.




एक हप्शी चतुर होता, त्याने संभाजींचे नाक दाबुन धरले,श्वासासाठी ओठ खुलले जिभ लपलपली, तशी सांशी आत घुसली आणी जिभ पकडली, ओढली आणी क्षणात नंगी तलवार फिरली,आणी तोंडातुन नुसतं रक्त ओघळलं,




जिभ पडली शरिराला रक्ताचा अभिषेक घालत, जिभ तळमळत होती,अरे ह्याच जिभेने मारलेली हाक माँसाहेब आबासाहेब....




ह्याच जिभने केलेल्या ईशारती मावळ्यांना,तिच जिभ आज तळमळत होती.




दुसरी आद्न्या डोळे काढन्याची.




हप्शी लालबुंद,तप्त सळई हातात घेऊन येतायत"मिटले नेत्र , दिसले ते आबासाहेब,माँसाहेब,आबासाहेबांचे स्वप्न माझा महाराष्ट्र...."



आणी ऊघडले नेत्र , सळई आली डोळ्यात घुसली,आत,आत,आतही आत,आणी आल्या त्याच वेगाने बाहेर,डोळे कुठेच ऊरले नव्हते,ऊरल्या होत्या त्या फक्त काळ्याकभिन्न खोबन्या.... कुणी यायचा हाताची बोटं कापायचा, कुणी यायचा पायाची बोटं छाटायचा , कुणी यायचा अंगामांसाचे लत्ते तोडुन कुत्र्यांना खायला द्यायचा.....




हात कापले, पाय कापले, बोकड सोलावा तसा माझ्या राजाला सोलला आणी त्यावर मिठापाण्याचा वर्षाव केला.....




जर्र्र जर्र्र झालं यातनांचं.....




आणी माझा राजा फक्त सोसत राहिला, सहन करत राहिला , फक्त तुमच्या, आमच्या , आपल्यासाठी.....




औरंगजेब विचारत राहिला," रोयेगा, चिल्लायेगा, आयेगा हमारे पास माफी माँगने के लिये?" आणी रौला खान सांगत राहिला,"ना हुजुर ना रोया ना चील्लाया ना आयेगा आपके पास माफी माँगने के लिये"




"तो जाओ हाश्ला करदो उसका."




आणि ऊगवली फाल्गुन मधिल अमावस्या(गुढिपाडव्याच्या आधिचा दिवस). . . आद्न्या सुटली, "संभाजीचं मस्तक छाटा,बहाळ्याच्या फडाला अडकवा आणी धिंड काढा त्याची...."




संभाजींचं मस्तक छाटलं, बहाळ्याच्या फडाला अडकवलं,आणी धिंड काढली वाजतगाजत.......




संभाजीराजे मेले पण औरंगजेब म्हणत राहिला-"कैसा था सुरुर बच्चा....




हमने जबान काट दि ईसकी लेकिन नही कहे वो रेहेम के दो लब्ज़ ईसने....




हमने आँखे निकाल दियी ईसकी पर नही झुकायी अपनी आँखे ईसने हमारे सामने......




हमने हाँथ काट दिये ईसके पर नहीं फैलाये इसने अपने हाँथ हमारे सामने.....




हमने पैर काट दिये ईसके पर नहीं टेके ईसने अपने घुटने हमारे सामने.....




हमने गर्दन ऊडा दियी ईसकी लेकिन नहिँ झुकी ईसकी गर्दन हमारे सामने......




सचमुच छावा है शेर का......




एवढं सोसुन सुद्धा माझा राजा ३५० वर्ष बदनाम राहिला..........




त्याने जे सोसलं ते स्वराज्यासाठी, शिवरायांच्या स्वप्नासाठी, तुमच्याआमच्यासाठीफक्त सोसत राहिला, सहन करत राहिला.....

सह्याद्रीची ऊंची गगना भिडलीय ती ऊगाच नाही........
अशा कित्येक संभाजींनी स्वतःला खर्ची घातलय तेंव्हा कुठे सह्याद्रीची ऊंची गगनाला टेकलियं.......

जय भवानी.......

जय शिवाजी......
जय संभाजी......."

No comments:

Post a Comment