Tuesday, January 10, 2012

हिंदू आहे तन मन आमुचे,हिंदू आमुचा बाणा


हिंदू आहे तन मन आमुचे,हिंदू आमुचा बाणा,
शंभू आहे दैवत आमुचे। शिवाजी आमुचा राणा
...हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही "श्रीं" ची कल्पना,
हर हर महादेव रणात झुंजला, झाली एकचि वल्गना
कित्तेक कटले वीर इथे, कित्तेकांचा झाला खात्मा,
तरिहि न झुकले शीर इथे, ना ही झुकला आत्मा
जगज्जेता आला इकडे, केली खूप गर्जना,
'पुरू'न उरला शूर जरीही, शत्रू न ठेवला विर्झना
यवन माजला, गनिम नाचला, घाबरला भारत सारा
शिव-शंभूच्या पद स्पर्शाने वाहिला, एकत्वाच वारा
काफर आला, काफर आला, गनिमास दिशा दिसेना,
हिंदुत्वाचा शन्ख फुन्कला, ही वीर मराठी सेना॥
हिंदुत्व आहे नीती आमुची, हिंदुत्व आमुचा कावा,
हिन्दुत्वासाठि जीवहीदेई, हा शूर मराठी छावा
हिंदुत्व आहे शास्त्र आमुचे, हिंदुत्व आमुचे अस्त्र,
हिंदुत्व आहे तीर्थ आमुचे, हिंदुत्व आमुचे गोत्र....

1 comment:

  1. bashapir bhai. Jai bhawani jai shivaji,jai marathi,jai hindurashtra

    ReplyDelete