Saturday, January 28, 2012

तुझ्या आठवणींनी पापणी ओली केली …

तुझ्या आठवणींनी  पापणी ओली केली …
कुठुन तरी मनात माझ्या तुझी आठवण आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली …

आठवण तुझी नसानसांना धक्का देउन जाते,
मन कधी प्रेमाचे कधी विरहाचे गीत गाते,
रोजच्यासारखीच आठवण तुझी नवीन वाटून आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली

वारा तुझा स्पर्श बनून जवळ येतो माझ्या,
क्षणात करतो आपल्या सा-या जुन्या आठवनी ताज्या,
वा-यालाही घेउन श्वासावाटे काळजापर्यंत गेली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली

घुसळून टाकलं मनं तिने जसं जमेल तसं,
मलाच सुचेना तिला आता बाहेर काढू कसं,
याच विचारात दिवस गेला, संध्याकाळही झाली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली …

संध्याकाळी वाटलं थोडं बरं वाटेल आता,
मित्रांबरोबर बसून थोड्या टाकू म्हटलं टापा,
चौपाटीवर गेल्यावर ती सांज डोळ्यापुढे आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ..

किती पाहशील अंत आता, परतून ये लवकर,
तुलाही ऐकू येत असेल माझ्या मनामधली घरघर,
जाणवतय मला तुझीही अवस्था माझ्यासारखीच झाली,
माझ्या आठवणीने, तुझी सुद्धा पापणी ओली केली .....

1 comment:

  1. Casinos Near Casinos Near Hollywood, LA - MapyRO
    Find Casinos Near Hollywood, LA near 당진 출장샵 Hollywood Casino and other popular destinations in LA. Use our 하남 출장안마 interactive map 밀양 출장샵 to explore 여수 출장샵 and book 안동 출장마사지 your stay!

    ReplyDelete