माझं विश्व, मराठी...... माझं स्वत्व, मराठी...... माझं ह्रदय, मराठी...... माझं मनही, मराठी...... माझी निर्मळता, मराठी...... माझी रसिकता, मराठी...... माझं दैवत, मराठी...... माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी.... माझं प्रेम, मराठी...... माझा श्वास, मराठी...... माझा हळवेपणा, मराठी...... माझे शब्द, मराठी...... मराठी......
Monday, January 16, 2012
गोळाबेरीज .
असाच आज विचार करत बसलो
माझ्या आजवरच्या जीवनाचा
गोळाबेरीज मांडायला बसलो
माझ्याच आयुष्यातील शब्दफुलांचा
...बेरजेत सगळे माझ्या गोळेच गोळे आले
...कसेही सोडवले तरी,गणित माझे उणेच आले
...करू तरी काय मी,माझी काय चुक
...प्रत्येक गोष्टीला आज इथे एक नवा लुक
काल जे सोपे होते,तेच आज कठीण झाले
कठीण का झाले शोधता शोधता
आयुष्य माझे शून्य झाले.....
कळले जेव्हा शून्यातच धावतोय
अर्थच माझ्या जीवनाचे सारे तेव्हा अर्थहीन झाले
...उपदेशांच्या भडिमारांचा पिरयामिड रचला लोकांनी
...शपथेवर मला आणि अपेक्षांनाही जगवला लोकांनी
...पण साला पिरयामिड पत्त्यांचाच डोलारा निघाला
...माझ्याच खांद्यावर अपेक्षांचा तेव्हा छानपैकी'जनाजा'निघाला...
पण मित्रांनो,
तेव्हाही तिथे एक कुणीतरी नाचत होत
माझ्याच नावाने मनापासून साखर कुणी वाटत होतं
पालवीच्या पानांमागे चंद्र जेव्हा लपत होता
माझ्यासाठी कुणीतरी तेव्हा तीळ तीळ मरत होतं
...मग कळले तेव्हा मला,गणितात मी मध्यात होतो
...काही उण्या अंकाचीच बेरीज मी करत होतो
...मग म्हटले जाउदे साला,पेपरच कठीण आहे
...अजून बराच वेळ आहे,आपल्याला कुठे घाई आहे
आता मात्र ठरवलयं मी हसतच जगणार
मीही आता मनाने कुणासाठी साखर वाटणार
अश्यामध्येच मित्रांनो एक फायदा असतो
आपलं झाकून मनामध्येच सारया जगाला हसवण्याचा आनंद असतो....
.......................................................... संदिप उभळ्कर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment