।। खांदेरी किल्ला ।।
आजचा शिवकालीन दिनविशेष
हा किल्ला दि. ११
जानेवारी १६८० हा किल्ल रोजी खांदेरी दुर्ग बांधून
झाला...
हा भारताच्या महाराष्ट्र
राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक
किल्ला आहे.
भौगोलिक स्थान
खांदेरीचा दुर्ग हा काही फार प्रसिद्ध दुर्ग
नव्हे; पण हे बेट मुंबईच्या समोरच असल्याने
अतिशय मोक्याचे आहे. इ.स.१६७९ च्या ऑगस्ट
महिन्यात शिवाजीमहाराजांनी मायनाक
भंडार्याला येथे पाठवून बेटावर
किल्ला बांधावयास काढला. हा किल्ला दि. 11
जानेवारी 1680 रोजी खांदेरी दुर्ग बांधून
झाला...या बेटावर
वेताळाचे एक मोठे राऊळ आहे.
त्याची पूजा केल्याशिवाय
कोणीही कोळी मासेमारीसाठी नावा समुद्रात
घालत नाहीत. बेटावर एक टेकडी आहे
आणि बेटालाच तटबंदी घातली आहे.
खांदेरी किल्ल्यास भेट देण्यासाठी प्रथम
अलिबागला जावे लागते. तेथून थळला जावे.
थळच्या किनारपट्टीवर थळचा भग्न
किल्ला आहे. तेथून नावेतून या जलदुर्गावर
जाता येते.
इतिहास
मायनाक भंडारी तटबंदी बांधत असताना ईस्ट
इंडिया कंपनीच्या मुंबईतील
वखारकरांती थांबवण्याचे आटोकाट प्रयत्न
केले. कॅप्टन विलियम मिंचिन, रिचर्ड केग्वीन,
जॉन ब्रँडबरी, फ्रान्सिस थॉर्प या नाविक
अधिकार्यांना खांदेरीवर पाठवून ते बेट
मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न
इंग्रजांनी केले. रिव्हेंज आणि हंटर
नावाच्या दोन
फ्रीगेटी त्यांनी पाठवल्या होत्या. गेप
आडनावाच्या माणसाकडून काही गुराबा
भाड्याने घेऊन त्यावर
काही तोफा कशातरी बांधून
त्यांनी इंग्रजी आरमार पाठवण्याचा प्रयत्न
केला.
मायनाक भंडार्याच्या मदतीला नंतर
दौलतखानाचा आरमारी ताफा आला. आलिबाग-
थळच्या किनार्यालगत असलेल्या या आरमाराने
इंग्रजी आरमारातल्या त्रुटी हेरल्या.
मराठ्यांच्या होड्या थळच्या किनार्यावरून
सामानसुमान घेऊन खांदेरी बेटावर निघत.
त्यांना प्रतिबंध
करण्यासाठी किनारा आणि बेट यांमध्ये
नाविक मोर्चेबंदी उभारण्याचे
इंग्रजांनी ठरवले होते; पण
त्यांच्या मोठ्या जहाजांना या खाडीमध्ये
ठिय्या देऊन राहण्याचे काम जमले नाही.
वार्यामुळे त्यांच्या होड्या किनार्याकडे
फेकल्या जात आणि त्या दगडांवर आपटून
फुटण्याची भीती असल्याने
इंग्रजांना ती जहाजे खोल पाण्यात
न्यावी लागली.
छोट्या गुराबा त्यांनी आणल्या असता डव्ह
नावाच्या त्यांच्या गुराबेवर पाठीमागे तोफ
नसल्याने ती त्रुटी हेरून मराठा आरमाराने
पाठीमागून चक्राकार हल्ला चढवून ती गुराब
पकडली आणि त्यावरच्या इंग्रजांना कैद करून
सागरगडावर डांबले.
या घटनेद्वारे सागराची भरती-ओहोटी, खोल-
उथळ पाणी, मतलय वारे, इत्यादींचे स्थानिक
ज्ञान मराठ्यांना इंग्रजांपेक्षा अधिक
असल्याचे दिसले. संगमेश्वरी
नावाच्या वेगळ्या आराखड्याच्या मराठा होड्यांनी या युद्धात
कमाल केली. मराठे रातोरात
या चिंचोळ्या होड्या वल्हवत बेटावर सामान
पोहचते करीत. इंग्रजी जहाजे पूर्णपणे
वार्यावर अवलंबून असत. खास
मराठा बनावटीच्या या होड्यांनी इंग्रज
आरमाराला आश्चर्यकारकरित्या चकवले.
संर्दभ - नेटसाभार
आभार - असे घडले शिवाजी महाराज
No comments:
Post a Comment