Saturday, January 21, 2012

आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आयुष्य जास्त सुंदर वाटत..

चारचौघात एकट बसण्यापेक्षा
कधीकधी समुद्रकिनाऱ्यावर
आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

... आपल्याला कोण हवंय
यापेक्षा आपण कोणाला हवंय
हेसुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आकाशातलेतारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्यतेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत....!!
मूळ लेखक -अज्ञात 

No comments:

Post a Comment