Saturday, January 21, 2012

प्रिये, माझ्याइतकंच..............

प्रिये,
माझ्याइतकंच निसर्गाचंही, तुझ्यावरती प्रेम आहे...

तुझ्याशी लगट करण्यासाठ
वारा हळुवार लहरतो,
तुला सुवासून टाकण्यासाठी
निसर्ग मनसोक्त मोहरतो ॥
तुला आकर्षित करुन घेणे,
हेच त्याचं Aim आहे...
कारण माझ्याइतकंच निसर्गाचंही, तुझ्यावरती प्रेम आहे...

तुझ्यासाठी पायघड्या म्हणुन
झाडांची पाने तो गाळतो,
कधी तुला भुलवण्यासाठी
अंगभर फुले तो माळतो ॥
माझ्यावर कुरघोडी करण्याचाच,
त्याचा हा सारा Game आहे...
कारण माझ्याइतकंच निसर्गाचंही, तुझ्यावरती प्रेम आहे...

तुला उजळून टाकण्यासाठी
सूर्यकिरणांनी तो झळाळतो,
तुझ्याकडे झेपावण्यासाठी
झर्‍या-धबधब्यातुन खळाळतो ॥
तुझ्या प्रीतिसाठी सर्वार्थाने
त्याने केला Claim आहे...
कारण माझ्याइतकंच निसर्गाचंही, तुझ्यावरती प्रेम आहे...

फक्त तुझ्या एका हास्यासाठी
अनंत काळ तो तरसलाय,
तुझ्या एका अश्रूमुळेही
अनेकदा धुंवाधार बरसलाय ॥
माझ्याशी निष्कारण स्पर्धा सोडली,
तर एरवी तसा तो Gem आहे...
अखेर,
माझ्याइतकंच निसर्गाचंही, तुझ्यावरती प्रेम आहे...

- ॥चैतन्य॥                                                                                                                                                                                (संदर्भ फेसबुक वाचनालय )

No comments:

Post a Comment